सिटी बेल | कल्याण |
बांधकाम कंपनीचे जमिनी बाबत हरकती वरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी एक लाख वीस हजाराची लाच मागितल्या प्रकरणी कल्याण तहसीलदार दीपक मारुती आकडे आणि त्यांचा लिपिक मनोहर दत्तात्रय हरड यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपक आकडे यापूर्वी खालपूर येथे तहसीलदार म्हणून नावलौकिक मिळवून गेले असल्याने खालापुरात लाच प्रकरणाची चर्चा रंगली होती .
यातील तक्रारदार यांच्या बांधकाम कंपनीने मौजे वरप ता.कल्याण येथे घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरिल सुनावनीचे निकालपत्र देण्यासाठी दि. 26/08/2021 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वत: करिता 1,00,000 रु लाचेची मागणी करुन ती कार्यालयीन शिपाई लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड याचेकडे देण्यासाठी सांगितली. बाबु उर्फ मनोहर हरड यांनी स्वत: करिता व स्टाफ करिता 20,000/ रु लाचेची मागणी केली. तक्रारदार त्याने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तुला माहिती दिल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला.
सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक बाबु हरड याने दीपक आकडे करीता 100000,/-रूपये व स्वतःकरीता 20,,000/-रूपये असे एकूण 1,20,000/- रूपये लाच रक्कम स्वीकारल्यानंतर लाप्रवि ठाणे पथकान रंगेहाथ पकडले. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक, डॉ. श्री.पंजाबराव उगले ,निलिमा कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे पोना प्रशांत घोलप , मपोना जयश्री पवार, पोशि विनोद जाधव , पोशि पद्माकर पारधी, चालक पोहवा महाले यांनी महत्वाची भूमिका बजावली.
भ्रष्टाचाराविरोधात नागरिकाने खतपाणी न घालता लाप्रवि ठाणे कार्यालय दूरध्वनी क्रं – ०२२- २०८१३५९८ , २०८१३५९९ @ टोल फ्रि क्रं. 1064 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Be First to Comment