Press "Enter" to skip to content

‘एकाच डोसमध्ये कोरोनाचा खात्मा’ होणार आता पर्यंतची सर्वात मोठी चाचणी

सिटी बेल लाइव्ह / अमेरीका वाशिंग्टन : 🔶🔷🔷🔶

कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

अंतिम टप्प्यात : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. आता आणखी एक लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे.

दावा : अमेरिकन कंपनी जॉन्सन ॲण्ड जॉन्सनने चाचणी अंतिम टप्प्यात सुरू झाली आहे. फक्त एकाच डोसमध्ये कोरोनाचा खात्मा होऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

रोगप्रतिकारक शक्ती : सध्या सुरू चाचणीत लशीचे दोन डोस द्यावे लागतात. त्यानंतर करोनाविरोधात लढण्यासाठी अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

मोठे यश : एकाच डोसमध्ये कोरोनाला अटकाव करणे शक्य झाल्यास हे मोठे यश समजले जाईल. अंतिम टप्प्यात ६० हजारजणांवर चाचणी होणार असल्याचे जॉन्सन ॲण्ड जॉन्सनने स्पष्ट केले आहे.

सर्वात मोठी चाचणी : ही चाचणी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरू आदी देशांमध्ये होणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या चाचणीपैकी ही सर्वात मोठी चाचणी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.