Press "Enter" to skip to content

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक व समिती सदस्यांची निवड जाहीर

भाजप महायुतीतून युवा नेते परेश ठाकूर, ऍड. प्रथमेश सोमण, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर  ; शेकाप काँग्रेस गटातून प्रकाश म्हात्रे व उबाठा गटातून नितीन गावंड

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर यांच्या निवडीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर आज (दि. ०६ मार्च )स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितींच्या सदस्यांची निवड झाली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृहात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या.  या निवडी संदर्भात पीठासीन अधिकारी म्हणून महापौर नितीन पाटील यांनी काम पाहिले. या सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, सचिव नानासाहेब कामठे यांच्यासह नगसेवक, नगरसेविका उपस्थित होते.        

महापालिकेत भाजप महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाल्याने त्यांना ५ स्वीकृत नगरसेवक पदे मिळाली. तर शेकाप-काँग्रेस गट व उबाठा गटाला प्रत्येकी एक पद मिळाले. त्यानुसार  स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहाचा दांडगा अनुभव असलेले युवा नेते परेश ठाकूर, ऍड. प्रथमेश सोमण, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर यांची तर शेकाप-काँग्रेस गटातून प्रकाश म्हात्रे व उबाठा गटातून नितीन गावंड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संख्याबळानुसार स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितीमध्ये महायुतीला १२, शेकाप काँग्रेस गटाला तीन तर उबाठा गटाला एक सदस्यपद ग्राह्य झाले. त्यामध्ये भाजप महायुतीकडून प्रवीण पाटील, मधू पाटील, समीर कदम, बबन मुकादम, रविंद्र भगत, विजय खानावकर, हेमलता गोवारी, रविंद्र जोशी, राजेश्री वावेकर, ऍड. मनोज भुजबळ, रुचिता लोंढे आणि अजय बहिरा, शेकाप कॉग्रेस गटाचे अरविंद म्हात्रे, हरेश केणी, तुषार पाटील व उबाठा गटातून प्रिया गोवारी यांची निवड झाली आहे. महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजप महायुतीमधून लीना म्हात्रे, अनिता पाटील, सोनल नवघरे, बायजा बारगजे, प्रतिभा भोईर, सरस्वती काथारा, शिला भगत, कुसुम पाटील, अस्मिता घरत, ममता म्हात्रे, रुचिता लोंढे, प्रियंका कांडपिळे, शेकाप काँग्रेस गटातून योगिता फडके, मनिषा म्हात्रे, अर्चना भोईर तर उबाठा गटातील मेघना घाडगे यांची निवड झाली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.