Press "Enter" to skip to content

सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स ने केला महापौर नितीन पाटील यांचा सत्कार

  पनवेल मधील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स या ठिकाणी होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. होलीका पौर्णिमेपासून रंगपंचमी पर्यंत अभिनव पद्धतीने होळी सण साजरा करण्यात येतो. या कॉम्प्लेक्स ने होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन भाई पाटील यांचा सत्कार केला.
    पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोरील छत्रपती संभाजी महाराज मैदानाला लागूनच सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स आहे. येथील रहिवासी नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतात तसेच अनोख्या पद्धतीने सण साजरे करत असतात. पारंपारिक पद्धतीने होळीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने रंगपंचमीपर्यंत रोज विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गुरुवार दिनांक ५ मार्च रोजी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन भाई पाटील यांचा सत्कार केला. नितीन भाई पाटील यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य लाभले आहे अशी भावना येथील सदस्यांनी बोलून दाखवली तसेच नितीन भाई पाटील यांच्या रूपाने पनवेल नगरीला एक प्रामाणिक आणि सजग महापौर मिळाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
     या सत्कार समारंभाला नगरसेवक राजू सोनी आणि माजी नगरसेविका नीता माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मित्रमंडळातील महेश भालेकर, प्रसाद गायकवाड,मंदार खुर्द, संतोष खुर्द, तुषार रसाळ, सुरेश कोटरिया, राहुल भालेकर आधी सदस्य यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.