Press "Enter" to skip to content

धर्मवीर वाहतूक सेनेची मागणी

कळंबोली स्टील मार्केट मधील बेकायदेशीर ओव्हरलोड मालवाहतूक तात्काळ बंद करा

पनवेल दि.०६ (वार्ताहर) : बेकायदेशीर ओव्हरलोड मालवाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी धर्मवीर वाहतूक सेनातर्फे पनवेल प्रादेशिक परिवहन यांना निवेदनद्वारे करण्यात आली.

कळंबोली स्टील मार्केट तसेच इतर औद्योगिक परिसरात अवजड वाहनांकडून होत असलेल्या बेकायदेशीर ओव्हरलोड मालवाहतुकीमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत कठोर कारवाई करून ही बेकायदेशीर ओव्हरलोड मालवाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,पनवेल जयंत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी धर्मवीर वाहतूक सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रामदास शेवाळे, उपाध्यक्ष पुण्यवंत खटकाळे तसेच अमोल काटकर, कुलदीप सिंग, संजय साळुंखे, अण्णासाहेब जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.