Press "Enter" to skip to content

वाचा हा विषेश लेख : कोल्हापुरी चपलेचा आणि इजिप्शन संस्कृतीचा संबंध

ईजिप्शियन सम्राट तुतेनखामेनची कोल्हापुरी ###

सिटी बेल लाइव्ह / विचार कट्टा / राजेश गायकर ###

मित्रांनो नेटवर सर्च करत असताना एक लिंक समोर आली आणि ती लिंक ओपन केली असता जगातल्या काही आश्चर्य कारक गोष्टींची माहिती त्यात दिली होती.यात मला कुतूहल वाटलं ते ईजिप्शियन सम्राट तुतेनखामेनच्या फॅशनेबल चपलेविषयी.. त्याची ती चप्पल त्या काळातील डिझायनर चप्पल असल्याचे म्हटले होते.आश्चर्य म्हणजे मला त्या चपलेत आणि
कोल्हापुरी मध्ये विलक्षण साम्य जाणवले. यासाठी मी थोडे अधिक जाणून घेण्यासाठी सर्च केलं असता माझ्या लक्षात आलं की हा राजा 3300 वर्षापूर्वी होऊन गेला. आणि गुगल सरांनी सांगितलंय की कोल्हापुरी चप्पल उद्योगाने आपल्याकडे बाळसे धरले साधारण चारशे वर्षांपूर्वी..#कोल्हापुरी चपलेचा आणि #इजिप्शन यांचा काही संबंध नसावाही..
अस असलं तरी पूर्वी कुठेतरी माझ्या वाचनात
ईजिप्शियन आणि #वैदिक भारतीयांतील साम्य व संबंध समोर आले होते
त्याप्रमाणे
इजिप्शन पिरॅमिडचा आर्किटेक एक भारतीय होता.एका स्वतंत्र लेखात मला समजले की इजिप्शियन चालीरीती,इजिप्शन प्रथा या वैदिक संस्कृती प्रमाणे आहेत. जसे नव्याने काही काम उभे करताना जमिनीचे भूमिपूजन करणे,यावेळी जमीनीत सोने पुरणे, अंत्यसंस्कार करताना केशवपन करणे,पाण्याचा मडकं फोडणं
सुर्य,चंद्र,नद्या,पक्षी,गाय,प्रकृती यांना देवतांची प्रतीके मानणे आदि. एवढेच काय तर चातुर्वर्ण्य प्रमाणे ईजिप्शियन मध्येही वर्णप्रथा होती.

आता हे सर्व वाचत असताना आपला प्राचिन व्यापार उद्योग तर ईजिप्त मार्गे युरोप म्हणजे अर्थात सुमेरियन एझटेक,बेबोलियन,युनानी सभ्यता बरोबर
मोठ्या प्रमाणात चालत असे..

मग हा सर्व गौरवशाली इतिहास चाळत असता माझ्यासारख्याचं
कुतूहल जागे होणे स्वाभाविक आहे…
हि डिझायनर चप्पल थेट #कोल्हापुरातून तुतेनखामेन जवळ पोचली असेल काय..?
कि व्यापाराच्या मार्गे हि कला 3300 वर्षांपूर्वी थेट #कोल्हापुरात आली असेल

राजेश गायकर
कामोठे,पनवेल
9819969991

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.