Press "Enter" to skip to content

पनवेल येथे हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न

सिटी बेल ∆ पनवेल ∆

नागपंचमी व रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन पनवेल येथे नुकतेच करण्यात आले. शहरातील काँग्रेस भवन हॉल नित्यानंद मार्ग राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान महानगर पालिका जवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र विनायक पाटील गुन्हेशाखा कक्ष 2 पनवेल नवी मुंबई यांच्या हस्ते या प्रदर्शनाला उद्घाटन करण्यात आले.

दिनांक १२ ऑगस्ट २०२३ ते ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जाचे असते, त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शनाचा पनवेल करांनी लाभ घ्यावा असे आवाहन हातमाग कापड प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोतन यांनी केले.

सुती कापडाचा वापर करणे हे कापसापासून तयार होते. कापूस अगदी महू आणि मुलायम असतो .त्यामुळे कापसापासून तयार केलेले कापड पाहुसाळामध्ये परिधान केल्यास आपल्याला कापसाच्या मुलायम पणा स्पष्ट जाणू शकतो. सुती कापड त्वचेचे गरम रक्षण कर्ण्यात त्वचेतील आद्रता कायम राकण्यात महत्वाची भूमिका बजावतात हे कापड वापरण्याचा इतिहास जुना आहे. अनेक वर्षापासून लोक सुती कापड्याचा वापर करत आले आहेत. भारतीय संस्कृती च्या प्रसार साठी व हातमागाचा प्रचार साठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पनवेल मध्ये १३ वर्षा पासुन हातमाग कापड प्रदर्शनाला पनवेल करांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिल्याने यावर्षी प्रदर्शन व विक्री आयोजित केले आहे.

श्री. पुरुषोत्तम पोतन, दीपक गुंडू, दत्तात्रय आरगे, बाळू कोडम, लक्ष्मण उडता , गोवर्धन कोडम, श्रीकांत श्रीराम, यांनी उपस्थित होते,या प्रदर्शना मध्ये विविध प्रकारच्या कॉटन साडी , इरकल साडी , मधुराई साडी , खादी साडी , धारवाड साडी , मधूराई सिल्क साडी , सेमी पैठणी, खादी सिल्क साडी , प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल , पटोला ड्रेस , कॉटन परकर , टॉप पिस , सोलापूर चादर , बेडशीट , नॅपकिन , सतरंजी , पंचा , टॉवेल , वुलनचादर , दिवाणसेट , प्रिंटेड बेडशीट , पिलो कव्हर , लुंगी , व शर्ट , कुर्ता , बंडी , गाहून , विविध प्रकारच्या विक्री साठी टेवण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर २०% टक्के सुट ठेवण्यात आले असून , पनवेल नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.