Press "Enter" to skip to content

वजन काट्याच्या कब्ज्यासाठी डिस्मा सोसायटीची गुंडागर्दी

खोटी कागदपत्रे दाखल केल्याने डिस्मा सोसायटी येणार अडचणीत

गुंडगिरी करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचा वरदहस्त ?

सिटी बेल ∆ कळंबोली ∆

कळंबोली लोखंड व पोलाद बाजार समिती अंतर्गत असणाऱ्या डिस्मा असोसिएशन च्या ताबेकब्ज्यातील वजन काट्यावर वर्चस्व मिळवण्याचे एका ठेकेदाराचे प्रयत्न कायदा पायदळी तुडवायला सुद्धा तयार असल्याचे दुर्दैवी चित्र तेथे पाहायला मिळत आहे.या वजन काट्याच्या लढाई बाबत आमच्या प्रतिनिधीने खोलात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अरेरावी करणाऱ्या ठेकेदाराच्या पाठी कुठले तरी अदृष्य हात सक्रिय असल्याचा संशय वजन काटा संचालकांना येत आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की,तीन दशकांहून अधिक वर्षे व्यापाऱ्यांची डिस्मा ( दारूखाना आयरन अँड स्टील स्क्रॅप मर्चंट असोसिएशन) ही संस्था कार्यरत आहे. व्यावसायिक वजन काटा आणि संस्थेच्या कार्यालयांकरिता सिडको ने या संस्थेस भूखंड दिलेले आहेत. कालांतराने याच संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत डिस्मा सोसायटीची स्थापना केली. वजन काटा उभारणे व तो चालवणे या कामी उभय पक्षांच्यात करारनामा झालेला असून त्यानुसार गेली तीन दशके अत्यंत सुरळीतपणे कारभार सुरू होता. कोरोना कालखंडात असोसिएशन आणि सोसायटी या दोन संस्थांच्या मतभिन्नता होण्यास निर्माण झाली. उदय पक्षी केलेल्या करारनाम्यानुसार सदरच्या व्यवसायात एकमेकांपासून फारकत घेण्याच्या प्रक्रियेबद्दल देखील नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार डिसमा असोसिएशन ने डीसमा सोसायटीस नोटीस पाठवून सदरच्या व्यवसायातील करारनामा रद्द करणे कामी प्रस्ताव ठेवला. पूर्वाश्रमीच्या वजन काटा चालक ठेकेदाराने रितसर पद्धतीने वजन काट्याचा ताबेकब्जा असोसिएशन कडे सुपूर्द केला. डीस्मा असोसिएशन ने नियमांच्या अधीन राहून नवीन काटा चालक ठेकेदाराची नियुक्ती केली असता, डिस्मा सोसायटीने काट्याचा कब्जा मिळवण्यासाठी गुंडगिरी केली,वजन काट्यावर हल्ला करत त्याची तोड फोड केली.डिस्मा असोसिएनकडून सदरचे प्रकरण न्यायालयात देण्यात आले आहे.डिस्मा सोसायटीच्या सांगण्यावरून तोडफोड व गुंडगिरी करणाऱ्या शर्मा नाम ठेकेदारावरती कळंबोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल आहे. गुंडगिरी करणाऱ्या या ठेकेदारावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून तो जामीनावर बाहेर असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

डिस्मा असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष सुभाष गुप्ता आणि उपाध्यक्ष बन्सल यांच्याशी याबाबत आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता सदर प्रकरणात आम्ही नियमांच्या आधीन राहून आणि कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अरेरावी करणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तींवर पोलीस कारवाई करतील याबाबत आमच्या मनात विश्वास असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

बळजबरीने सदर काट्यावर वर्चस्व मिळवून पाहणाऱ्या शर्मा नामक ठेकेदाराने न्यायालयात खोटे दस्तावेज सादर केल्याचे देखील सूत्रांचे म्हणणे आहे.

या व्यक्तीवर याआधीही केस नंबर १९६/२२ भादवी
४२०/४०६/३४ नुसार गुन्हे दाखल आहेत.

कायदेशीर मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने व्यवसाय करू पाहणाऱ्या व्यावसायिकांना जोर जबरदस्ती करून त्रास देणाऱ्या ठेकेदाराच्या पाठीमागे कोणा अदृश्य व्यक्तीचे हात आहेत ? ते शोधून काढणे गरजेचे झाले असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.