Press "Enter" to skip to content

पाच जणांना अलिबाग पोलीस, नौसेना तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरूप काढले बाहेर

फिलिपाइन्स येथील महाकाय जहाजात झाला स्फोट : जहाज आले नवगाव समुद्रकिनारी खडकात

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

रायगड जिल्हयातील अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे दोन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केलेल्या फिलिपाइन्स येथील महाकाय जहाज अडकले असून त्यामध्ये महाकाय स्फोट झाला आहे.मात्र कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.जहाजमध्ये एक भारतीयसहित इतर चार परदेशी नागरिक कार्यरत होते.त्यांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने रौद्र रूप धारण केले असुन समुद्रात देखील सोसायट्याचा वारा आणि पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्हयात गेल्या तीन दिवसात जहाज भरकटण्याचे प्रकार घडले आहे.मुरूड तालुक्यातील पद्मदुर्गकिल्ल्याच्या मागील बाजूस समुद्रात गुजरात राज्यातील बलसाड जिल्ह्यातील मच्छिमारी बोट भरकटत आली होती,त्यांनतर उरणच्या समुद्र किनाऱ्यावर महाकाय बार्ज भरकटले होते.तर आज पहाटे परदेशी महाकाय जहाज हे अलिबाग तालुक्यातील नवगावच्या समुद्रात तील खडकात अडकले.

अलिबागपासून साधारणपणे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नवगाव येथील समुद्राच्या खडकात एक परदेशी महाकाय जहाज भरकटले आहे.सदर जहाज हे दोन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलेले आहे.हे जहाज दुबई येथून मालदीव येथे जात असताना यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे जहाज अलिबाग तालुक्यातील रेवस येथे सात आठ दिवस उभे होते.या दरम्यान यामधील तांत्रिक बिघाड दूर करून सदर जहाज हे गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट2022 रोजी सायंकाळी मालदीव येथे जाण्यासाठी निघाले होते.मात्र वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने सदर जहाजाने समुद्रा नांगर टाकले होते. मात्र वारा हा सोसाट्याचा असल्याने जहाज हे हेलकावे खात नवगाव येथील समुद्र किनारी लागले.मात्र त्या जहाज खडकावर आढळल्याने त्या जहजाला छिद्र पडले. त्या छिद्रातून पाणी हे जहाजात जाऊन जहजातील बॅटरी कक्षात पाणी घुसले.त्यामुळे त्याचा स्फोट झाला.त्यावेळी बोटीमध्ये असणारे कर्मचारी यांनी याबाबत माहिती पोलीस स्टेशन,भारतीय तटरक्षक डाळ आणि भारतीय नौसेनेला दिली.अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांना ही माहिती मिळताच त्यांनी थळ येथील आरसीएफ कंपनीच्या आवारात असणारे सीआयएफचे असणारे हेलिपॅड येथे भारतीय तटरक्षक दलाचे चेतक नामक हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी घेतली.

अलिबाग व मांडवा पोलीस स्टेशन,भारतीय तटरक्षक डाळ आणि भारतीय नौसेनेचे कर्मचारी यांनी एकत्रित येऊन त्यांनी जहाजमधील पाच कर्मचारी यांना चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविले.या जहाजाचा कॅप्टन हा पांडे नामक भारतीय आहे तर इतर चार कर्मचारी हे परदेशी आहेत अशी माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.