रेवदंडा येथून पळून आलेला मुलास पनवेल तालुका पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात
सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
रेवदंडा येथून शाळेत जातो असे सांगून पनवेल या ठिकाणी पळून आलेल्या अल्पवयीन शालेय विध्यार्थाचा पनवेल तालुका पोलिसांनी पनवेल एस. टी स्टॅन्ड परिसरात शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्त केल्यावर पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
उभे राहिले .
रेवदंडा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी भ्रमणध्नीद्वारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना कळविले की एक अल्पवयीन मुलगा वय वर्ष अंदाजे 13 हा सकाळी शाळेत जातो असे सांगून घरातून निघाला पण शाळेत न जाता तो पनवेल येथे एस टी बस ने आला आहे.
सदर माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर , पोलीस नाईक जयदीप पवार, पोलीस शिपाई सतीश दराडे व चालक नीरज पाटील यांच्या पथकाने पनवेल बस स्थानक पिंजून काढले असता सदर मुलगा हा बावरलेल्या शाळेच्या गणवेशात स्थितीत फिरताना आढळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याच्या बाबतची माहिती दिली व रागाच्या भरात आपण आलो असल्याचे त्याने सांगितले.
मायेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी सदर मुलाला पोलीस ठाण्यात आणून त्याचा राग शांत करून त्याची आस्थेने समजूत काढली. त्यानंतर सदरबाबत तात्काळ रेवदंडा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले व त्यांनी ही माहिती सदर मुलाचे आई,वडील व शाळेतील शिक्षकांना दिली असता त्यांनी आनंदित होऊन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व त्यांच्या पथकाचे आभार मानले आहेत .
Be First to Comment