सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
गेली दोन वर्षे कोरोना काळात कोणतेही सण उत्सव साजरा करता आले नाहीत. मात्र या वर्षी कोरोनाचे निर्बंध हटल्याने विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊ लागले आहेत.यावर्षी श्री हनुमान जन्मोत्सव संपूर्ण उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मुळेखंड, करंजा, पागोटे, कोटनाका आदी उरण तालुक्यातील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उरण शहरांमध्ये श्री हनुमान मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी खूप मोठी गर्दी केली होती. शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या उरण शहरातील गणपती चौकातील हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता ह.भ.प. सुधीर महाराज पाटील(डाऊर नगर )यांचे सुश्राव्य असे किर्तन केले. यावेळी हार्मोनियम वादक भारत पाटील, तबला वादक विशाल पाटेकर यांनी सुंदर असे वादन केले.सकाळी 8 ते दुपारी 2 दरम्यान श्री गजानन प्रासादिक भजनी मंडळाचे भजन झाले.
वसंत मांडेलकर,गणेश सावंत, जगदिश भोईर,शैलेश राऊत, मधुकर पाटील, नितीन वर्तक आदींनी भजना द्वारे प्रेषकांना मंत्रमुग्ध केले. दुपारी 12 ते 3 दरम्यान कै. सुनिता महादेव ढोले, कै. मीना के.रुपचंदानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ढोले परिवार व रूपचंदानी परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर श्री गुरु दत्त प्रासादिक भजन मंडळ वावंजे (कुंभार पाडा) यांचे भजन झाले.त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आले . श्री गजानन प्रासादिक भजन मंडळाने उत्तम असे भजन गाऊन पालखी मिरवणुकीत रंगत आणली.व शेवटी मंदिरात आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
श्री हनुमान जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी उरण शहरातील गणपती चौकातील श्री हनुमान जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष विपुल पारेख, उपाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे, सचिव विठ्ठल ममताबादे, सल्लागार रोहित पाटील,खजिनदार भागवत महाराज, सह खजिनदार मधुकर नाईक, व्यवस्थापक रघुनाथ हातनोलकर, गजानन भोईर, रेखा पाटील, निर्मल ममताबादे,सदस्य मनोज म्हात्रे, राजू माळी, चंद्रकांत साठे, मिलिंदा माळी, सुविधा म्हात्रे, प्राजक्ता भागवत, अर्चना करंगुटकर,राहुल भालेकर,जयंत पाटील, अशोक पालकर, प्रमोद मुकादम, गणेश ढोले,महादेव ढोले, प्रीतम काठे, बाळकृष्ण सावंत आदी श्री हनुमान जन्मोत्सव मंडळ, गणपती चौक,उरण शहरच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
Be First to Comment