Press "Enter" to skip to content

तुमचं व्हाट्सअप आता आणखी सुरक्षीत

व्हाट्सअप वर आता नवं लाॅक फिचर : जाणुन घ्या कसा लावायचा व्हाट्सअप ला लाॉक

सिटी बेल • मुंबई •

व्हाट्सअप चा वापर आजच्या काळात प्रत्येक स्मार्टफोन यूजर करत आहे. यामुळे हे मेसेजिंग ॲप आपल्या ग्राहकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. युजर्सचा वैयक्तिक डेटा सुरक्षित करण्यासाठी 2 स्‍टेप व्हेरिफिकेशन मेसेज, डिसएपीयर फीचर्स आणि बरंच काही ऑफर करतं.

याशिवाय व्हाट्सअप ने लॉक फीचरही दिले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हाट्सअप लॉक करू शकता. जे तुमच्या परवानगीनंतर पुन्हा उघडता येणार नाही. दुसरीकडे, जर कोणी फेस ऑथेंटीकेशन आणि फिंगरप्रिंट स्कॅनरशिवाय उघडण्याचा प्रयत्न केला तर हे फिचर त्या व्यक्तीचे नाव देखील सुचवते.

इनेबल करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत
हे फिचर स्मार्टफोन युजर आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. ते इनेबल करण्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकिंग आवश्यक आहे. फोन लॉक केल्यानंतर, तुम्ही व्हाट्सअप कॉल्स प्राप्त करू शकणार नाही. आपल्या स्मार्टफोन आणि आयफोनवर व्हाट्सअप कसे लॉक करायचे ते जाणून घेऊया.

आयफोन युजर्ससाठी

• सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Apple iPhone वर WhatsApp उघडावे लागेल.
• त्यानंतर वरच्या बाजूला दिलेल्या सेटिंग्ज बटणावर टॅब करा.
• आता तुमच्या खात्यावर जा.
• त्यानंतर Privacy या पर्यायावर क्लिक करा.
• खाली स्क्रोल करा आणि स्क्रीन लॉक पर्याय निवडा.
• आता टूगल ऑन करा, एकदा लॉक फिचर इनेबल झाल्यावर, तुम्ही फेस आयडी आणि पिन वापरून व्हाट्सअप अनलॉक करून वापरू शकता.

अँड्रॉइड मध्ये लॉक कसे करावे :

• सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा.
• नंतर वरच्या बाजुला असलेल्या तीन बिंदूंवर टॅब करा.
• आता मेनूमधील सेटिंग्जवर जा.
त्यानंतर सेटिंगमध्ये अकाउंट ऑप्शनवर जा आणि प्रायव्हसी ऑप्शन निवडा.
• त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करा आणि फिंगरप्रिंट लॉक करा.
• एकदा हे फिचर इनेबल झाल्यानंतर, तुम्ही फिंगरप्रिंट वापरून ते अनलॉक करू शकता.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.