Press "Enter" to skip to content

संपूर्ण महाराष्ट्रात होणार लोडशेडींग ?

अख्या महाराष्ट्रात ८ तास होणार अंधार ? : वाचा काय करणार ठाकरे सरकार !

सिटी बेल • मुंबई •

आपल्या सर्वांना ज्या गोष्टींची चिंता होती ती गोष्ट आपल्या पदरी पडणार आहे. राज्यात विजेची मागणी वाढत असल्याने अख्या महाराष्ट्रात भारनियमन म्हणजे लोडशेडिंग आखली जाणार आहे.

अनेक दिवसांपासून वीजेचे संकंट घोंघावत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. लाईट बील भरा असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात सध्या 3,000 मेगावॅट ते 4,000 मेगावॅट विजेची तूट आहे.

देशात सध्या कोळशाची कमतरता आहे. त्यामुळे वीजनिर्मीतीला अडथळा येत आहे. उन्हाळा लवकर सुरू झाल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असताना, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला लवकरच ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंगचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आता महावितरणने लोडशेडिंगचे वेळापत्रक जारी केले आहे.

दरम्यान लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महावितरणला वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि लोडशेडिंग टाळण्यासाठी वीज खरेदीचे इतर पर्याय पाहण्याचे निर्देश दिले आहेत.महाराष्ट्रात काही भागात दिवसा आठ तास तर काही भागात रात्री आठ तास वीज मिळणार नाही .

दरम्यान राज्यातील विजेची मागणी आधीच 28,589 मेगावॅटवर पोहोचली आहे, जी लवकरच 30,000 मेगावॅटपर्यंत वाढू शकते. वीज मागणी विक्रमी 8.2 टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईची मागणी 3400 मेगावॅट आहे, ती आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंग टाळण्यासाठी, राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी येथे झालेल्या विशेष बैठकीत राज्य संचालित वीज वितरण कंपनी महावितरणला कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून 60 मेगावॉट तात्पुरते 5.50 ते 5.70 रुपये प्रति युनिट दराने घेण्यास परवानगी दिली आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून वीज खरेदीसाठी महावितरणचा पुढील अडीच महिन्यांचा खर्च 100 कोटी ते 150 कोटी रुपये असणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. राज्याच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.