कर्नाटक येथे लोककला महोत्सवात उरणच्या दत्ता भोईर आणि समूह करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व : कर्नाटकात कोळी नृत्याची धमाल
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असणारे लोक गीत कोळी गीत,नृत्याचा नजराणा नाखवा माझा दर्या चा राजा चे निर्माता दत्ता भोईर व त्यांच्या समूहाला च्या नृत्य कलेची दखल कर्नाटक येथील संस्थानी घेऊन त्यांची यावेळेस सुद्धा कर्नाटक येथे होणाऱ्या लोककला महोत्सवात महाराष्ट्राच्या वतीने प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे.
या लोककला महोत्सव चे आयोजन दिनांक 9 एप्रिल 2022 ते 11 एप्रिल 2022 रोजी उडप्पी येथे होणार आहे. सदर महोत्सवात भारतातील 25 राज्यांनी सहभाग घेतलेला आहे विविध राज्यातील लोककला व नृत्यकला महोत्सवात सादर केल्या जातील. आपल्या महाराष्ट्राची लोककला व नृत्य परंपरा कोळी व लावणी यातून सादर करण्यासाठी सलग तिसऱ्यांदा उरण भेंडखळ येथील श्री दत्ता भोईर आणि समूह यांना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली.
या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन मंगेश कांबळे ,यामिनी रागा मॅडम या करणार आहेत,आहे या त्यांच्या निवडी साठी त्यांना महाराष्ट्रा तून शुभेच्छां चा वर्षाव होत आहे.
Be First to Comment