Press "Enter" to skip to content

उरणच्या जलतरणपटू चा पराक्रम

आर्य किशोर पाटील याने 5 तास 31 मिनिटात मांडवा ते गेट ऑफ इंडिया पोहून केले पार

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण तालुक्यातील केगांव दांडा येथील रहिवाशी तथा उत्तम जलतरणपटू आर्य किशोर पाटील (वय वर्षे 10, इयत्ता 5 वी ) याने मांडवा ते गेट ऑफ इंडिया हे 18 कि.मी एवढे अंतर पोहून 5 तास 31 मिनिटात पार केले.

आर्य हा उरण मधील सेंट मेरीज हायस्कूल मध्ये शिकत आहे. त्याच्या या पराक्रमात त्याचे वडील किशोर पाटील जे स्वतः राष्ट्रीय जलतरणपटू आहेत. तसेच त्याचे गुरु /कोच हितेश भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आर्यने सकाळी 5:25 मिनिटला मांडवा येथून समुद्रात उडी मारून समुद्राच्या लाटांना झुंज देत हा विक्रम केला आहे. या पराक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत असून आर्यच्या नातेवाईकांनी , मित्र परिवार, चाहत्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.