Press "Enter" to skip to content

अँजिग्राफी, कॅन्सर निदान आता रायगडातच होणार

जिल्हा सामान्य रुग्णालयात बसविले कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्र

आरसीएफ कंपनीने सीएसआर फंडातून केली मदत : ग्रामीण भागातील रुग्णांचा मुंबई, पुणे खर्च वाचणार

सिटी बेल • रायगड़ • धम्मशील सावंत •

शरीरात नसेमध्ये रक्ताच्या गाठी, कॅन्सरच्या गाठी झाल्या असतील तर रुग्णाला मुंबई, पुणे शहरात जाऊन हजारो रुपये खर्च करून आजाराचे निदान करावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या हृदय विकारावरील अँजिग्राफी किंवा कॅन्सर सारख्या आजारावर निदान आता रायगडातच होणार आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराचे निदान कळावे यासाठी कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर मशीनचे लोकार्पण आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने याच्या हस्ते करण्यात आले.

आरसीएफ कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून ही मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रायगडकरांच्या पैशाची आणि वेळेची बचत होऊन कमी पैशात आजाराचे निदान होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.