Press "Enter" to skip to content

सोनारी येथे ३ ट्रेलरला आग

एकाच वेळी ३ ट्रेलरला कशी लागली आग ? अपघात, घातपात की बनाव ? रहस्य गुलदस्त्यात !

पहा बर्लींग ट्रेलरचा थरार…👇

सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •

तालुक्यातील सोनारी गावाजवळील चांदणी चौक परिसरात आज भरदुपारी अचानक ३ ट्रेलरला आग लागून ते जळून गेले आहेत. जीवितहानी टळली आहे.

सोनारी चांदणी चौक येथे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रेलरला आग लागली. या आगीत ३ ट्रेलर जळाले आहेत. आग लागल्याचे समजताच जेएनपीटी व सिडको अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाले. वेळीच आग आटोक्यात आल्याने दुर्घटना टळली, कारण हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप होते.

या घटनेत ३ ट्रेलर आगीत जळून गेले आहेत. मात्र जीवितहानी टळली आहे. सदर आग अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला आग लावल्याने भर रखरखत्या उन्हात वाऱ्यामुळे ट्रेलरला आग लागल्याने ३ ट्रेलर आगीत जळाले असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.