Press "Enter" to skip to content

मोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

शिवसेनेचे केगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुनील नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून ते वाचले असले तरी अद्याप आरोपीना अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील कृष्णा नाईक वय ५३ राहणार विनायक केगाव याचे राहत्या घराचे दुरुस्तीचे बांधकामाचे काम सुरू आहे. त्यांच्या जुन्या घराचा रॅबिट टेम्पोत भरून त्यांच्या शेतात घेऊन जात होते. त्या घेऊन जात असलेला रॅबिटचा टेंपोस सोनी कुमावत यांचा घरासमोर दीपक कुमावत याने अडवून, हा रोड आमचा मालकीचा आहे. असे बोलून टेम्पो चालकास कुमावत याने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या भीतीने टेंम्पो चालकाने ज्याचे रॅबिट आहे, त्या सुनील नाईक या मालकास हि हकीकत सांगितली. त्यानंतर सुनील नाईक सदर टेम्पो अडवला त्या जागेवर जाऊन, हा रास्ता सार्वजनिक आहे. येथून मला माझ्या स्वतःचा शेतात माझा घराचे रॅबिट टाकाचे आहे. तुम्ही माझ्या ड्राइव्हरला का अडवता ? यावर महिलांनी सुनील नाईक यांना शिवेगाळ केली.

याच दरम्यान मागून येऊन दीपक शांतीलाल कुमावत याने सुनील नाईक याना ठार मारण्याचा उद्देशाने डोक्यात रॉड मारला. या रॉडच्या फटक्याने सुनील खाली पडला. त्यानंतर शांतीलाल कुमावत याने पाठीवर काठीने फटके मारले.

सदरचा वाद सुनील यांचा घरी समजल्याने सुनीलची पत्नी व मुलगी घटनास्थळी पोहचली. त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. सुनील यांच्यावर उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार केले.

सुनील नाईक यांनी मोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. पोलिसांनी दीपक कुमावत, शांतीलाल कुमावत,आबा यांचे संपूर्ण नाव माहित नाही ,संविदा दीपक कुमावत, व तिचा सोबत एक महिला तिझें नाव माहित नाही यांचा वर भारतीय दंड संहिता १८६० कलम ३४१, ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांना या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आले नसल्याचे समजते. पुढील तपास मोरा पोलीस करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.