Press "Enter" to skip to content

महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 25 बेड आणि ब्लड स्टोअरेज केंद्राचे उद्घाटन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 25 सुसज्ज बेड आणि ब्लड स्टोअरेज केंद्राचे तसेच महाआरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आरोग्य उपसंचालक गौरी कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, प्रांत अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे,कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक संकेत भासे, सुनील गोगटे,रवींद्र माने,अप्पा बैलमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार थोरवे पुढे म्हणाले, सगळीकडे कोव्हीड महामारी चे संकट असताना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोय सतावत होत्या, त्यावेळी फक्त पाच बेड उपलब्ध होते. आता आपल्याकडे 75 बेड उपलब्ध झाले आहेत, कोव्हीड महामारीच्या उपाययोजना करून आरोग्य यंत्रणा सक्षम केली असून लसीकरण 95 टक्के झाले असून शासन आणि प्रशासन एकत्र येऊन काम करत असल्याचे सांगितले. लवकरच ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करणार असल्याचे सांगून आतापर्यंत कोव्हीड उपाययोजनेसाठी आमदार निधीतून सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सहा ते आठ तारखेपर्यंत विविध आरोग्य तपासण्यांचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून नेत्र चिकित्सा तपासणी,त्वचा रोग,दंत चिकित्सा, स्त्री रोग तपासणी,इसीजी तपासणी,बाल रोग तपासणी,अस्थिरोग तपासणी,कान,नाक घसा तपासणी, शालेय आरोग्य तपासणी आदी आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहेत.

तळ मजला,पहिला मजला, दुसरा मजल्यावर विभागवार कक्ष निर्मिती केली असून तळ मजल्यावर नोंदणी आणि औषध वाटप विभाग आहे. शिबिराची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. या शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ . मनोज बनसोडे यांनी केले आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.