उरण व पनवेल मधील त्या 32 गावांना “नैना” नाहीच ! नैनाचे वरिष्ठ नियोजनकार रविंद्र मानकर यांचा खूलासा
सिटी बेल | उरण | सुभाष कडू |
उरण मधील लोकप्रतीनीधी,शेतकरी व पत्रकार व ‘नैना’चे आधिकारी यांची बैठक नवी मुंबई येथील नैना च्या कार्यालयात पार पडली. यावेळी उरण मधील 32 विभागात गेले काही दिवस घोंगावत असलेलं ‘नैना’ नावाचे चे वादळ हे गैरसमजूतीने उडालेला धुरळा आसल्याचे सिद्ध झाले आहे.हि 32 गावं “खोपटा नवे शहर” मध्ये मोडत आहेत. आसे स्पष्टिकरण रविंद्र मानकर वरिष्ट नियोजनकार नैना आणी खोपटा टाऊन यांनी केल आहे. शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे प्रतीपादन केलं. या बाबत प्रत्येक ग्रामपंचायतींना खूलासा पाठविण्यात येणार आसल्याचे त्यांनी सांगीतले.
नवी मुंबई व नैना यांच्या मधोमध वसणार्या “खोपटा नवे नगर” या शहरात पनवेल तालुक्यातील सात आणी आणी उरण तालुक्यातील 25 आशी एकूण 32 गावे ही मोडत आहेत.यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधीकारण म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगरवीकास विभागाने नेमणूक केली आहे.
या आगोदर सिडकोने 4एप्रील 2013 साली पनवेल तालुक्यातील दिघाटी,साई, कासरभट, डोलघर, कर्णाला ,बारापाडा या सहा गावांचा “खोपटा नवे नगर” या शहरासाठी 3 एप्रिल 2008 साली विकास आराखडा तयार केला आहे. आत्ता 2जून 2021 रोजी उर्वरीत 26 गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या व आगोदरच्या सहा गावांच्या विकासा आराखड्याची पाहणी करून बदल करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने सिडकोला दिल्या आहेत.
…. गैरसमजातून अफवा आणी मग नागरीकांची धावाधाव ...
हा आराखडा तयार करताना नागरीकांच्या घरांबाबत माहीती मिळावी व ति घरे वगळून आराखडा तयार करता यावा, म्हणून सिडकोने ग्रामपंचायतींकडून माहीती मागीतली होती.परंतू कोणी तरी अज्ञानाने वा कशाने अफवा पसरवली की या 32 गावांना “नैना” लागणार आहे. आणी मग हारकतींचे आर्ज भरणे, गावोगावी सभा घेणे यासाठी जनतेची धावपळ सूरु झाली.
… आशी झाली ‘नैना’ कि “खोपटा नवे शहर” याची उकल
या संदर्भात प्रथम पंचायत समीती कार्यालयात झालेल्या वसई-विरार- अलिबाग काॅरीडोर संबंधी झालेल्या बैठकीत, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी प्रश्न उपस्थीत केला. त्यांनी प्रांताधीकारी राहुल मुंडके यांना याबात थेठ प्रश्न विचारून खूलासा करण्यास सांगीतले. त्यावेळी प्रांताधीकार्यांनी याबाबबत प्रथम खुलासा केला.नंतर संतोष ठाकूर यांनी या बाबत नैनाचे वरिष्ठ नियोजनकार रविंद्र मानकर यांना याबात विचारले आसता ‘नैना’ नसून “खोपटा नवे नगर” असा खूलासा झाला.
….बैठकीला उपस्थीती…..
या वेळी चिरनेर, खोपटे,कोप्रोली,पिरकोन,सारडे,वशेणी,गोवठणे, आदी गावांमधून हजारो वैयक्तिक हरकती घेऊन संबंधित ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच , ” नैना” व “खोपटा नवे नगर” चे मुख्य नियोजनकार रविंद्र कुमार मानकर व वरिष्ठ नियोजनकार प्रांजली केणी, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर,उरण पंचायत उपसभापती शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजिराव परदेशी,शेकाप चाटणीस सुरेश पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड,सारडे सरपंच चंद्रशेखर पाटील,वशेणी सरपंच जीवन गावंड,माजी ग्रा.पं सदस्य चिरनेर सुभाष कृ.कडू, सामाजीक कार्यकर्ते गोरख ठाकूर, सामाजीक कार्यकर्ते रुपेश पाटील विविध राजकीय पक्षीय स्थानिक पदाधिकारी व नेते, तसेच उरण विभागातील सामाजिक संस्थांचे अध्यक्ष व कार्यकर्ते व विविध गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते.
Be First to Comment