Press "Enter" to skip to content

रायगड ४० + मास्टर्स बिग बॅश क्रिकेट स्पर्धेस मान्यवरांची उपस्थिती

सिटी बेल | उरण |

रायगड ४० + मास्टर वेलफेअस क्रिकेट असोशिएशन यांच्या तर्फे भेंडखळ – उरण येथे रायगड ४० + मास्टर्स बिग बॅश क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा कॉंग्रेसच्या प्रभारी सौ. चारुलता टोकस, सहप्रभारी श्रीरंग बरगे, रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र्शेठ घरत यांनी भेट दिली.

रायगड कॉंग्रेस च्या प्रभारी सौ. चारुलता टोकास या स्वतः शुटींगबॉल पट्टू आहेत. त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांनी ४० + मास्टर्स बिग बॅश या क्रिकेट सामन्यांचे अतिशय उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र्शेठ घरत हे धडाडीचे जिल्हाध्यक्ष असून युवकांचे आयडॉल आहेत असे गौरवउद्गार काढले.

याप्रसंगी कॉंग्रेस नेते मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, अखलाख शिलोत्री, किरीट पाटील, जेष्ठ नेते राम भगत, लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, अमोल ठाकूर, रवींद्र पाटील तसेच क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.