Press "Enter" to skip to content

राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर छ. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक

रायगड परिसराला छावणीचे स्वरूप, कडक पोलीस बंदोबस्त तैनात

ऐतिहासिक किल्ले रायगडावर येऊन छ.शिवरायांना नतमस्तक होणं, प्रत्येक भारतीयांसाठी गौरव व अभिमानाचा क्षण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

सिटी बेल| रायगड | धम्मशील सावंत |

देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी ( दि . ६ ) किल्ले रायगडावर आले . राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे . पोलिसांनी गडाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली असून कडक बंदोबस्त तैनात केला आहे . शिवभक्तांच्या भावनांचा आदर करीत राष्ट्रपती रोप वेने रायगड किल्ल्यावर पोहचले . राष्ट्रपतींचे दुपारी १२.१५ वाजता पाचाड येथे आगमन झाले.

यावेळी गडावरील पूर्व नियोजित कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पडले. याच प्रसिद्ध किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजी राजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती गोविंद यांनी गडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशनही केले.

आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाले की, “‘ रायगड किल्ल्याला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या यात्रेला आपण तीर्थक्षेत्र मानतो, असे ते म्हणाले. निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संभाजी राजांचे आभार मानले. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाले की, विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते.”

राष्ट्रपतींनी आपल्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. याशिवाय गडावरच असलेल्या जगदीश्वर मंदिरालाही भेट दिली.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी,खासदार छत्रपती सभांजी राजे, खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले,आ अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेद्रं कल्याणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी आदी उपस्थित होते.

किल्ले रायगड शिवरायांच्या राजधानीचा हा किल्ला आहे . दरवाजे , राजवाडा , मनोरे , राजसिंहासन , शिवरायांचे स्मारक अशा अनेक वास्तू गडावर आहेत . गडावर पाणी व निवासाची व्यवस्था उत्तम आहे . पाचाड येथे राजमाता जिजाऊंचे देखणे स्मारक आहे . अशा या ऐतिहासिक परपंरा असणाऱ्या किल्ल्यावर भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली आहे . ही खूप मोठी ऐतिहासिक घटना मानली जातेय . राष्ट्रपती कोविंद यांनी राजदरबार येथील शिवप्रतिमेस अभिवादन करून समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी देशाला संबोधित केले. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी किल्ले रायगड परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करून कसून तपासणी केली जात होती.

गेल्या काही वर्षापासून केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने रायगड किल्ला संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे . रायगड किल्ल्यावर विविध सोयीसुविधा , देखभाल , प्राथमिक दुरुस्ती आणि पर्यटकांना जाण्यासाठी रस्ते तयार होत आहेत . महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांसाठी विशेष योजना राबवित आहे . भारताचे राष्ट्रपती यांची रायगड किल्ल्यावरील भेट म्हणूनच आगामी काळात खूप महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रपती किल्ले रायगडावर येणार म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.