वयाच्या बाराव्या वर्षीच मनाली ने 211 किलोमीटरचा केला सायकल प्रवास
सिटी बेल | पनवेल |
कुमारी मनाली भोसले (वय – बारा वर्ष ) हीला लहानपणापासूनच सायकलींचे प्रचंड आवड असून आता तिने सायकलिंग चे रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे नुकताच शिर्डी ते पुणे असा 211 किलोमीटरचा प्रवास तिने नुकताच पूर्ण केला आहे तसेच प्रवास पूर्ण होताच शिवनेरी किल्ल्यावर देखील चढाई करून इतिहास घडविला आहे.
कु. मनाली भोसले खांदा कॉलनीतील सेंट जोसेफ स्कूल ची विद्यार्थिनी असून इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे मनाली भोसले ही मूळची सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका मधील शिवाजीनगर या मूळ गावची असून पनवेल खांदा कॉलनीतील एकता रेसिडेन्सी मध्ये राहावयास आहे.

सायकलींची प्रचंड आवड असल्याकारणाने सायकलिंग क्षेत्रामध्ये तिची मेहनत करण्याची तयारी आहे 211 किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात पूर्ण केल्याने तिच्या सामर्थ्य ध्येय आणि शक्तीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या कामी तिचे वडील प्रमोद भोसले आणि आई क्षितिजा भोसले तसेच आजोबा विश्वास भोसले व आजी लीलावती भोसले तसेच आत्या वैशाली जगताप व सतीश जगताप हे तिला मोलाचे मार्गदर्शन तसेच तिला मदत करत असतात या तिच्या कौतुकाबद्दल एकता सोसायटीचे चेअरमन अवध पाल व सेक्रेटरी मोहन गायकवाड सर यांनी तिचे खास अभिनंदन केले आहे.






















Be First to Comment