Press "Enter" to skip to content

एसटी कर्मचाऱ्यांची भेट

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट

सिटी बेल | पनवेल – उरण |

काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांनी आज पनवेल आणि उरण येथील एसटी डेपो मध्ये जाऊन संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी महेंद्र घरत यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांना दिलासा दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा व लवकरच हा संप मिटवा जेणेकरून प्रवाशांचे देखील हाल होणार नाहीत अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी महेंद्र घरत यांच्यासोबत काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष मिलिंद पाडगावकर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.