Press "Enter" to skip to content

लसीकरण आपल्या दारी

शिवसेनेतर्फे उरण शहरात प्रभाग निहाय फिरते लसीकरण

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

शिवसेना उरण शहरच्या वतीने संपूर्ण शहरात प्रभाग निहाय लसीकरण व फिरते लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कोव्हाक्सीन व कोविशिल्ड लसीचे डोस अठरा वर्षा वरील नागरिकांना उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये पहिला व दुसरा डोस यांचा समावेश होता.

सदर लसीकरण कार्यक्रम उरण शहरात सलग दहा दिवस तर फिरता लसीकरण कार्यक्रम एक आठवडा राबविण्यात आला. फिरता लसीकरण कार्यक्रमात एका फोन ने लसीकरण मोबाईल व्हॅन उरण शहरातील नागरीकांच्या घराजवळ उपलब्ध केली जात होती.

शिवसेनेच्या वतीने कोविड लसीकरण कार्यक्रम व फिरता लसीकरण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून शिवसेनेचे आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.