Press "Enter" to skip to content

जयहिंद पाटील यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |

केगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी अनिल तुकाराम वाघमारे यांना जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी जयहिंद शंकर पाटील यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणारे अनिल तुकाराम वाघमारे हे केगाव काठेआळी येथील नैसर्गिक नाल्यामध्ये 5 जुलै 2021 रोजी जाळी बसविण्याचे काम करीत होते. त्यावेळी त्याच्याबरोबर उदय प्रभाकर गिजम हे सोबतीला होते. यादरम्यान जयहिंद पाटील यांनी अनिल वाघमारे यांना अश्‍लील शिविगाळ व जातीवरून जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यानंतर 11 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात जातीवाचक शिविगाळ केली होती, याची तक्रार अनिल वाघमारे यांनी मोरा सागरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

अनिल वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार मोरा पोलीस ठाण्यात जयहिंद पाटील यांच्याविरोधात भादवी कलम 504 व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 3(1) (आर), 3(1) (एस) अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सब इन्स्पेक्टर चंद्रहार पाटील हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.