सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
कोरोनाचा भविष्यकाळातील तीसऱ्या लाटेचा सांभाव्य धोका लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.सदरची बाब लक्षात घेता ही लस आपल्या गावातच मिळावी म्हणुन ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांच्या प्रयत्नातून आणि राजिप सदस्य विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य उपकेंद्र घारापुरी येथे ग्रामपंचायतीचे माध्यमातून गावातील अपंग तसेच १८ वर्षांवरील नागरीकांसाठी कोविल्डशीलचे १०० डोस (पहिला डोस ८० आणि दुसरा डोस २० ) उपलब्ध करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन म्हात्रे,सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील,सौ.ज्योती कोळी,सौ.मीना भोईर, सौ.सुभद्रा शेवेकर,सौ.शुभांगी मायने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थांचे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच तालूका आरोग्य अधिकारी उरण डॉ.ईटकरे वैद्यकीय अधिकारी प्रा. आरोग्य केंद्र कोप्रोली डॉ.भोसले, निलेश झावरे त्यांचे सहकारी या सर्वांचे सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला या बद्दल सर्व मान्यवरांचे सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मनापासुन आभार मानले.

याआधी ४५ वयोगटावरील नागरिकांचे ९०% लसीकरण झाले आहे. तसेच दि.२३/०८/२०२१ रोजी १८ वर्षांवरील नागरीकांसाठी ग्रामपंचायतीचे माध्यमातून ५० डोस घारापुरी येथे उपलब्ध केले होते.
त्यामुळे घारापुरी येथेच नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करुन ग्रामपंचायतीला धन्यवाद देत आहेत.













Be First to Comment