सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण करंजा गावाजवळील जंगल वाट असलेल्या ठिकाणी रविवार दि. २९ ऑगस्ट रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह किरण सदानंद कडू याचा असल्याचे पत्नी व मुलांनी सांगितले. किरणने नोकरीला लावण्यासाठी घेतलेल्या पैशाच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी काही तासातच ७ जणांना अटक करून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मयत किरण कडू मूळचा उरण नवघर येथील सध्या वास्तव्य नवी मुंबई बेलापूर शाहबाज याने नोकरीला लावण्यासाठी करंजा गावातील तरुणांनाकडून लाखो रुपये उकळले होते. मात्र अनेक महिने उलटूनही नोकरी ही नाही व पैसे देण्याचा किरण नाव घेत नव्हता. अनेक वेळा पैसे मागूनही देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतापाच्या भरात रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी ४ तरुणांनी किरण याच्या घरी जाऊन त्याला गोडीगुलाबीने गाडीत बसवून करंजा द्रोणागिरी डोंगरात आणले. त्या ठिकाणी इतर नातेवाईक आल्यावर या सर्वांनी किरण यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये तो बेशुद्ध झाला. पळून जाऊ नये म्हणून किरण याचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांसमोर ओळख पटविणे गरजेचे होते. परंतु पोलिसांची तपास यंत्रणा त्वरित फिरल्याने मयताच्या पत्नी व मुलांनी मयत किरण कडू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी किरणला कोणी कोणी दम दिले होते. त्यांची नावे पोलिसांना दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरली.
या प्रकरणात साहिल श्याम कोळी(२९) करंजा कोंढरीपाडा, नयन मनोहर कोळी (१९) करंजा कोंढरीपाडा, हिमांशू कैलास बंदरे (२५) करंजा कासवलेपाडा, यश प्रेमानंद कोळी (२३) करंजा कासवलेपाडा, विघ्नेश परशुराम कोळी (३०) करंजा कोंढरीपाडा, राजेश बाबू कोळी (५०) पनवेल कोळीवाडा, अभिजित हरिश्चंद्र चौगुले (२७) डोलघर पनवेल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
या प्रकरणात बंदर विभागाचे सह पोलीस आयुक्त सचिन सावंत, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत व त्यांची टीम वर्क यांच्या सहकार्याने किरण कडू याच्या हत्येचा उलगडा अवघ्या काही तासातच झाला. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे उरण परिसरात अभिनंदन केले जात आहे.













Be First to Comment