द्रोणागिरी हायस्कूलच्या पाठीमागे होता एका ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
करंजा गावातील द्रोणागिरी हायस्कूलच्या पाठीमागे एका ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

आज गावातील काही तरुणांना अज्ञात इसम बांधलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी याची माहिती सरपंच मंगेश थळी यांना देताच त्यांनी उरण पोलीस स्टेशनला यांची कल्पना दिली. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन तपास सुरू केला. परंतु सदर इसम गावातील नसून अज्ञात इसम असून तो मृत अवस्थेत होता.

त्यामुळे या अज्ञात इसमाचा खून का आत्महत्या अशी चर्चा गावात सुरू आहे. तरी सदर फोटोतील अज्ञात इसम कोणाच्या ओळखीचा असेल त्यांनी उरण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उरण पोलिसांनी केले आहे. पुढील तपास सुरू आहे.













Be First to Comment