Press "Enter" to skip to content

१८ वर्षांपेक्षा पुढील सर्वांना उरणमध्ये दररोज मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस

जाणुन घ्या उरणमध्ये कुठे सुरू आहे कोव्हीड लसीकरण केंद्र

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसचा डोस घेणे आवश्यक बनले आहे. लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असताना उरणमध्ये मात्र शासनमान्य कोविड लसीकरण सेंटर म्हणून उरण कोटनाका येथील शारंगधर व आंनदनगर येथील मोरे हॉस्पिटलमध्ये दररोज कोविशिल्ड लसीचा डोस माफक दरात मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच हौसिंग सोसायटी अथवा कंपनीत जाऊन लसीकरण करू शकतात. तरी ज्यांना कोणाला लस घ्यावयाची असेल त्यांनी डॉ. सत्या ठाकरे व डॉ. विकास मोरे यांच्याशी संपर्क साधावा.

कोरोनावर मात करण्यासाठी लस घेणे हा उत्तम उपाय असल्याचे शासनाने सुचविले आहे. त्यामुळे राज्यात शासनाने मोफत लसीकरण सुरू केले होते. परंतु त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. तरी लसीकरण करणे जड जात होते. याला पर्याय म्हणून शासनाने खासगी लसीकरणास परवानगी दिल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खासगी लसीकरण सुरू आहे.

उरणमध्ये ही शासनमान्य लसीकरण करण्यास उरण कोटनाका येथील शारंगधर व आंनदनगर येथील मोरे हॉस्पिटलला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस १८ वर्षांपेक्षा पुढील व्यक्तींना ७८० रुपयांत मिळणार आहे. तसेच एखादी हौसिंग सोसायटी अथवा कंपनी आदी ठिकाणी घटनास्थळी जाऊन लसीकरण करू शकणार आहेत.

तरी ज्यांना कोणाला लसीकरण करावयाचे असेल त्यांनी हॉस्पिटल शारंगधर व मोरे हॉस्पिटलला अथवा ९६१९२९२३७४, ९८६९१२५६२५, ८१०८५१७२७१, ९६५७७७६१८२ या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. सत्या ठाकरे व डॉ. विकास मोरे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.