उरण च्या तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे सह कोप्रोली मंडळ अधिकारी सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल
सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |
उरणच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्यासह ९ दलालांविरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुक, मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार आणि संगनमताने कट रचल्याच्या कलमांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबईतील जमिन व्यावसायिक किसन राठोड यांनी हा दणका दिल्याने उरणमध्ये खळबळ माजली आहे.
उरण पोलिस ठाण्यात जमीन गैरव्यवहार प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल दलालांसह नऊ जणांचा समावेशआहे.
आरोपींमध्ये तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे , घनश्याम भोईर, संदेश भोईर, संग्राम घरत, किशोर केणी, बाळकृष्ण महादेव ठाकूर, योगेश खारपाटील, निलेश चंद्रकांत पवार, विनायक ताम्हणकर आणि मंड़ळ अधिकारी हुसेन सय्यद यांचा समावेश आहे.
राठोड यांनी उरण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जवळपास १ कोटी ८३ लाख रुपये किमतीची ९७ गुंठा जमीनीचा गैरव्यवहार केला असल्याचे राठोड यांनी गुन्ह्यात म्हटले आहे.
नवी मुंबईत पनवेलसह गोडे सध्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत ! उरण पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने संध्याकाळी तातडीने गुन्हा नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली.
गोडे सध्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर मंत्रालयात कार्यरत असल्याचे समजते. अनेक वर्षापासून जमिनीच्या व्यवहाराला पेव फुटले आहे. महसूल खात्याच्या काही अधिकान्यांना हाताशी धरून स्थानिकांनी जमीन घोटाळ्यात हात मारला आहे. मात्र तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्या वर गुन्हा दाखल झाल्याने महसूल खात्यात खसखस पिकली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
अशा अनेक प्रकरणांची व एजंट लोकांची चौकशी व्हावी अशी मागणी उरणवासीयांनी केली आहे. या बातमीने खोटी कामे करणारया एजंट चे धाबे दणाणले आहेत.













Be First to Comment