सिटी बेल | उरण | बातमीदार |
उरण मधील दिव्यांग बांधवांच्या कोवीड लसिकरणासाठी, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक चेअरपरसन मेडीकल एड, लायन संदिप म्हात्रे हे दिव्यांग बंधू धावत आले आहेत.त्यांनी 156 कोविशील्ड चे डोस मोफत देवून संपूर्ण लसिकरणाचा खर्च केला.
सदर लसिकरण शिबीर “लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई च्याम्पियन”, “उरण मेडिकल वेल्आफेअर आसोशिएशन” , व “बेरोजगार आपंग जीवन विकास समाजकल्याण संस्था उरण” यांच्या संयुक्त विद्यमाने, उरण मधील डाॅ सत्या ठाकरे यांच्या शारंधर हाॅस्पिटल मध्ये सोमवार दि. 5 जूलै रोजी करण्यात आले. या लसिकरण शिबीराच उद्घाटन,लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट चे गव्हरनर लायन एल.जे.टावरी यांच्या हास्ते करण्यात आले.
कोरोना महामारीत दिव्यांग बांधव आपल्या उदार्निर्वाहासाठी झुंझत असताना, कोरोना लसीकरणासाठी त्यांच्यासाठी प्रशासनाने कोणतीही वेगळी व्यवस्था केली नसल्याने,कोरोना लसीकरण करून घेण हि त्यांच्यासाठी कठीण झाल होत.त्यांची हि आडचन लक्षात घेता ,स्वत दिव्यांग असलेले , व उरण तेलीपाडा येथील रहिवाशी लायन्स क्लबचे डिस्ट्रिक चेअरपरसन मेडीकल एड, लायन संदिप म्हात्रे हे दिव्यांग बंधू धावत आले,व त्यांनी उरण येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी कोरोना लसीकरण शिबीराच आयोजन केल.या शिबिरात १५६ दिव्यांग बांधवांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला.
यावेळी,लायन संदिप म्हात्रे,डाॅ.सत्या ठाकरे,डाॅ.विकास मोरे, समाजसेवक संतोष पवार,प्राध्यापक राजेंद्र मढवी, महेंद्र म्हात्रे हे उपस्थीत होते.यावेळी दिव्यांग बांधवांनी व उपस्थितांनी लायन संदिप म्हात्रे यांचे कौतूक करून त्यांचासारख्या समाज कार्याची समाजाला गरज आहे















Be First to Comment