Press "Enter" to skip to content

उरणमध्ये कोरोनाचा मोठा आकडा ; ९७ जण पॉजेटीव्ह तर ४ मयत

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत चालला आहे. उरणमध्ये ही अनेक तरुणांना कोरोनाची बाधा होऊन जीव गमवावा लागला आहे. आज कोरोनाच्या आलेल्या रिपोर्टमध्ये मोठा आकडा म्हणजे ९७ जण पॉजेटीव्ह येऊन ४ जण मयत झाले आहेत. तर फक्त ९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लॉकडाऊन असूनही गावोगावी कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्यानेच प्रादुर्भाव वाढत चालला आहे. प्रशासनही याची दखल घेताना दिसत नाही. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंट याचे पालन करणे बंधनकारक असतानाही ते होताना दिसत नाही. त्यात गावोगावी लग्न सोहळा, देवदेवांचे सण व इतर सामाजिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. त्यावेळी नियमांचे उल्लंघन सर्रासपणे होताना दिसते. त्याचे विपरीत परिणाम काही दिवसानंतर दिसू लागतात. तसेच काहीजण आजार लपवत काही नाही थोडा त्रास आहे, एक दोन दिवसांत ठीक होऊन असे सांगून उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. मग एकदम त्रास जाणवू लागल्यानंतर धावाधाव करण्यास सुरुवात करतात. तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

प्रशासनाने गावोगावी ग्रामपंचायतींच्या मदतीने त्यांच्यावर जबाबदारी देत गावेगावी घरटी माणसांची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांना पुढील उपचारासाठी पाठवणे गरजेचे आहे. प्रशासना बरोबर आम जनतेची तेवढीच जबाबदारी आहे. परंतु तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंट यांचे पालन करीत नसल्यामुळेही उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

गेले दोन तीन दिवसांपासून कोरोनाची आकडेवारी कमी होती परंतु मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील तरुणांचा समावेश जास्त असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मृत्यूत ही वाढ होत चालली आहे. तरीही काही वेळेपूर्ती जनता हळहळ व्यक्त करते पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसते.

आजचा कोरोना रिपोर्टची ९७ ही आकडेवारी व ४ मयत झाले आहेत. हे पाहून प्रशासना बरोबर तालुका व शहरातील आमजनतेने कमीकमी आपले आपल्या कुटुंबाचे, नातेवाईक व मित्रपरिवार यांचे जीव सुरक्षित रहाण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंटचा तरी कमीतकमी वापर करणे आवश्यक आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आकडेवारी निश्चितच कमी होईल. अन्यथा कोरोनाचा विळखा आणखीन आवळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आता सर्वांनीच जबाबदारीने वागणे गरजेचे बनले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.