
आवरे प्रतिनिधी( मुकेश गावंड )
भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळा जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सुरुवातिला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुळात ही संस्था ज्यांनी स्थापन करण्यात आली त्या आत्माराम ठाकूर मिशन व जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
नियोजन बध्द संचलन व देशाभिमान जागृत करत राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024- 2025 मध्ये पहिली आलेली इयत्ता नववीची विद्यार्थिनी दीक्षा उदय म्हात्रे हीला देण्यात आला तसेच राष्ट्रगीत ध्वजगीत व देशभक्तीपर गीत गायन करून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत प्रांगणात अगदी देशाभीमान अस वातावरण निर्माण करेल अशी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. प्रांगणातील कार्यक्रमांत विद्यार्थ्यांची आवरे गावात प्रभातफेरी काढण्यात आली यात अनुक्रमे रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे येथे ध्वजारोहण व ग्रुप ग्रामपंचायत आवरे येथे ध्वजारोहण करण्यासाठी सदर विद्यार्थी उपस्थित झाले.
पुन्हा प्रांगणात विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळवलेल्या स्पर्धां व शैक्षणिक प्रगतीची वाटचाल याचे वार्षिक पारितोषक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतीक ठाकूर खजिनदार श्री वामन ठाकूर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे पालक प्रतिनिधी मेंबर उपाध्यक्षा सारिका गावंड आवरे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पालक प्रतिनिधी आवरे गोवठणे पाले येथील ग्रामस्थ सदस्य विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अशा प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे येथे स्वतंत्र भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडण्यात आला.



Be First to Comment