Press "Enter" to skip to content

आगरी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित महेंद्रशेठ घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

उलवे 29 :
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते
श्री. महेंद्रशेठ घरत यांना कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने आगरी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक, कामगारहिताच्या व जनसेवेतील कार्याचे कौतुक केले.
पुरस्कार हा त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाची पोचपावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मुरबा गणपती ट्रस्ट चे पदाधिकारी व न्हावे गावातील महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.