

पेण खारेपाटाला पाण्यापासून वंचित ठेवणारे येथील लोकप्रतिनिधी – संजय जांभळे
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागाच्या सर्वसामान्य जनतेला गेल्या साठ सत्तर वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणारे येथील सत्ताधारी आमदार रविशेठ पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील हे दोन्ही लोकप्रतिनिधी असल्याचा घनघात शेकापक्षाच्या वडखळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय जांभळे यांनी आपल्या प्रचाराच्या शुभारंभांवेळी केले.
२३ वडखळ जिल्हा परिषद गटातील शेकापक्ष उमेदवार संजय जांभळे यांच्या प्रचाराचा श्रीफळ वडखळ इंद्रनगर येथील क्षेत्रेश्वर मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाढविण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षापासून येथील जनतेची दिशाभूल स्थानिक लोकप्रतिनिधी करत असून ते या निवडणुकीत पुन्हा उमेदवार उभे राहिले आहेत.मात्र कामांच्या बाबत ते निष्क्रिय असल्याने त्यांनी नेहमीच जनतेची दिशाभूल केली आहे.याउलट आपणांकडे प्रशासनाकडून जनतेची कामे कशी मार्गी लागतील याचा अनुभव असल्याने येथील जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधक खऱ्या अर्थाने हतबल झाले आहेत.एकीकडे आदानीचे स्मार्ट मिटर लावून जनतेची लुट शासन करीत असल्याने नागरिकांनी याला वेळीच आळा घातला पाहिजे माझ्या विरोधात उभ्या असलेल्या प्रभाकर म्हात्रे यांनी येथील जनतेची कोणती कामे केली आहेत ते दाखवून द्यावे असे यावेळी संजय जांभळे म्हणाले.
तर शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे म्हणाले की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार न करून देणारा एकमेव नेता म्हणजे संजय जांभळे आहे.आजवर त्यांनी येथील जनतेसाठी अनेक विकासात्मक कामे केली असून अहोरात्र जनतेसाठी धावून येणारा असल्याने येत्या ७ तारखेला जिल्हा परीषद निवडणूकीचे उमेदवार संजय जांभळे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार ललिता म्हात्रे हे दोन्हीं शेकापक्षाचे उमेदवार निश्चितच निवडून येतील यात तिळमात्र शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संजय जांभळे आणि ललिता म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वडखळ, इंद्रनगर, नवेगाव, कोळवे या भागात प्रचार रॅली काढण्यात आली सदर प्रचार रॅलीत नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



Be First to Comment