विना मोबदला, कोणताही पगार, मानधन न घेता उरण मधील डॉक्टर करणार कोरोना रुग्णांची मोफत सेवा
कोरोना काळात उरण मधील डॉक्टरांनी दाखविले माणुसकीचे दर्शन
उरणच्या डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी
विनामूल्य सेवा देणारे देशातील पहिलीच संघटना
सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या, हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सची अपुरी संख्या, अपुरे मनुष्यबळ, कोरोना रोगामुळे वाढते मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता उरण मधील सर्व डॉक्टरांनी एकत्र येत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील कोरोना सेंटरवर कोरोना रोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार सेवा देणार आहेत. तसे पत्रही उरण मेडिकल वेलफेयर असोसिएशन तर्फे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आलेले आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सिडको ट्रेनिंग सेंटर बोकडवीरा येथे कोविड -19 रुग्णांना रुग्णसेवा देण्याकरिता DCHC सुरु करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड -19 रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता व अपुऱ्या मनुष्य बळाच्या अभावी डॉ विकास मोरे-अध्यक्ष मेडिकल वेलफेयर असोसिएशनच्या माध्यमातून 36 हुन जास्त डॉक्टरांनी सिडको ट्रेनिंग सेंटर बोकडवीरा येथील कोरोना सेंटर येथे विनामूल्य रुग्णसेवा देण्याकरिता तहसीलदार यांनाही विनंती केली होती तसे पत्रव्यवहार उरण मधील सर्व डॉक्टरांनी तहसीलदार यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडे केल्याने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यास रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्याकडून परवानगी मिळाले आहे.
उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्यासोबत 9/4/2021 रोजी झालेल्या मीटिंगमध्ये तहसीलदारांच्या विनंतीस मान देऊन वाढते कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता उरण DCHC मध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून त्या ठिकाणी उरण मधील डॉक्टर विनामूल्य सेवा देण्यास तयार आहेत उरण मेडिकल वेलफेयर असोसिएशनने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली आहे. आम्ही डॉक्टर व आमची टीम कोणताही आर्थिक मोबदला न घेता हे सेवा देण्यास तयार आहोत. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कोरोना विषयक सर्व नियम पाळून ही सेवा देणार आहोत असे उरण मेडिकल वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विकास मोरे यांनी सांगितले.
कोरोनाच्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना एकीकडे माणुसकी लोप पावत चालल्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.मात्र उरण मधील डॉक्टर याला अपवाद आहेत. अजूनही माणुसकी जिवंत आहे याचे जिवंत उदाहरण आपल्या कर्मातून उरण मधील डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपले व्रत मनापासून प्रामाणिक पणे विनामूल्य सेवा देणारे डॉक्टर आज ईश्वराचे दुसरे रूप आहेत. सर्व डॉक्टर देवासमान आहेत.असे मत उरण मधील नागरिकांनी व्यक्त केले आहे.उरण मधील डॉक्टरांच्या विनामूल्य सेवेच्या कार्याचे, निर्णयाचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे. प्रशासनासह जनतेनेही डॉक्टरांचे सोशल मीडियाद्वारे मनापासून जाहीर आभार मानले आहेत.
Be First to Comment