
रोहा : समीर बामुगडे
समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे कार्यरत असलेले तथा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार हे दिव्यांग क्षेत्रात अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने व समर्पित भावनेने कार्यरत आहेत दिव्यांग व्यक्तींच्या समस्या हक्क पुनर्वसन व सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने यंदाचा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ साईनाथ पवार याना मराठी अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
हा भव्य पुरस्कार सोहळा २५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे पार पडला असून या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते साईनाथ पवार यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष इरफान मुल्ला सचिव शिवाजी पाटील उपाध्यक्ष संदीप बारस्कार रोहा तालुकध्यक्ष सुनील झोलगे सचिव प्रविण मोरे तळा तालुकाध्यक्ष किशोर पितळे कैलास जंगम नामदेव कोदे नवनाथ सुटे गोरख बाबरे प्रविणा म्हस्कर संतोष निकम तसेच सर्वं दिव्यांग व सामाजिक स्तरावरील मान्यवर व्यक्तींनी साईनाथ पवार यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव करत आहे



Be First to Comment