
कलंबोली : प्रतिनिधी
रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी कळंबोली येथील नवीन सुधागड हायस्कूलच्या सभागृहात अनंत गीते यांच्या हस्ते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक प्रगती कैलास पाटील, लीना अर्जुन गरड, उत्तम मोर्बेकर, प्रिया गोवारी, प्रतीक्षा गोवारी, मेघना घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लढवय्या उमेदवारांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेते श्री. बबनदादा पाटील, शिवसेना उपनेते बाळमाने, अवदूत शुक्ला, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, शिवसेनेचे दोन्ही उपजिल्हाप्रमुख श्री. रामदास पाटील व भरत पाटील, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, अवचित राऊत, प्रदीप ठाकूर, ग्राहक कक्षाचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे, तालुका संपर्कप्रमुख रामदास पाटील, शहरप्रमुख रामदास गोवारी, हेमंत म्हात्रे, प्रदीप केणी, सूर्यकांत मस्कर, विभागप्रमुख महेश गुरव, संतोष म्हात्रे, सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख व कार्यकर्ते, युवासेनेचे नितीन पाटील व अजय पाटील, महिला संघटिका संगीता राऊत, सुनंदा पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शिवसेना उपनेते श्री. बबनदादा पाटील यांनी केले होते.


Be First to Comment