
२७ जानेवारी रोजी सकाळी १० श्री क्षेत्रेश्वर मंदिर वडखळ येथे प्रचाराचा श्रीफळ वाढविण्यात येणार
पेण, ता. २५ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या वडखळ गटातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपण निवडणूक लढवत असल्याने येथील जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात अपप्रचार सुरू केला आहे मात्र त्याला येथील जनता बळी पडणार नाही असे वक्तव्य उमेदवार संजय जांभळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
शेकापक्षाचे सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या वडखळ गटातून निवडणूक लढवत असताना येत्या २७ तारखेला संजय जांभळे आपला अर्ज मागे घेणार असल्याच्या अपप्रचार विरोधक करत आहेत मात्र जनतेने अशा लोकांवर विश्वास ठेवू नये संजय जांभळे हा जनतेतील कार्यकर्ता असून आजही सर्वसामान्यांसाठी अहोरात्र धावत जात आहे त्यामुळे जनतेचे पाठबळ पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले आहे.या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसून येत्या २७ जानेवारी रोजी सकाळी १० श्री क्षेत्रेश्वर मंदिर वडखळ येथे प्रचाराचा श्रीफळ वाढविण्यात येणार असल्याने याकरिता नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जांभळे यांनी शेवटी केले.



Be First to Comment