सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरणमध्ये गेली दोन दिवस कोरोनाची आकडेवारी कमी येत होती. मात्र आज अचानक ७७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये ही याचा प्रत्यय येत आहे. आजच्या कोरोना रिपोर्टमध्ये ७७ रुग्ण कोरोना पॉजेटीव्ह दाखविले आहेत. तर २८ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
केगाव मधील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. उरणमध्ये शासकीय यंत्रणा गावोगावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याने तसेच एखाद्याचा कोरोना टेस्ट झाल्यानंतर रिपोर्ट ३ ते ४ दिवसांनी येतो त्यामध्ये जो पॉजेटीव्ह येतो तो मात्र रिपोर्ट येईपर्यंत इतरांना तिर्थप्रसाद देऊन येतो. यामुळेच उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची जनतेत चर्चा सुरू आहे.
उरणमध्ये काही क्षेत्र हे कोरोना बाधीत केले असून त्याची माहिती प्रसारमाध्यमाला मागणी करूनही दिली जात नाही.
यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. तरी प्रशासनाने कोरोनाची उरणमधील माहिती प्रसारमाध्यमाला द्यावी जेणेकरून जनतेत जनजागृती करता येईल.
Be First to Comment