JNPT व्यवस्थापन व्हेंटलेटर, फिजिशियन डॉक्टर्स व रेमिडिसेवीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून देणार
खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख मा.आमदार मनोहर शेठ भोईर यांची JNPT अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या सोबत कोविड-19 बाबत तातडीची बैठक
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।
कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्यात अनेक नागरिक बाधित झाले असून राज्यात विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्याना सर्वतोपरी मदत करा असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनानुसार खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख मा.आमदार मनोहर शेठ भोईर माजी जिल्हाप्रमुख व जे एन पी टी चे विश्वस्त श्री दिनेश पाटील,विश्वस्त श्री भूषण पाटील, माजी विश्वस्त श्री रवी पाटील व उरण नगर पालिकेतील शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे यांनी JNPT चे अध्यक्ष श्री संजय सेठी व उपाध्यक्ष श्री उन्मेष वाघ यांच्या सोबत तातडीने बैठक घेऊन उरण तालुक्याचा व J N P T परिसरातील कोविड-19 आजाराचा आढावा घेतला.
सदर मीटिंग मध्ये सर्व मान्यवरांनी व्हेंटलेटर, फिजिशियन डॉक्टर्स व रेमिडिसेवीर इंजेक्शन तातडीने JNPT व्यवस्थापने उपलब्ध करून दयावे अशी मागणी केली, ही मागणी JNPT अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मान्य केली व तातडीने त्याची अंमलबजावणी करून जे एन पी टी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दयावी असे आदेश देण्यात आले.













Be First to Comment