Press "Enter" to skip to content

उरणमध्ये कोरोना प्रादुर्भाव संदर्भात जनजागृती

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उरण जिटीपीएस बोकडविरा येथे जनजागृती करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अणि जिल्ह्यातील तालुक्यामध्ये हा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होणार्‍या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असल्यामुळे अणि रुग्णांनी ताप खोकला अंगावर काढल्यामुळे रुग्णांची प्रकृती चिंताजनक होत आहे. आजच्या घडीला सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध राहिलेले नाहीत.
अशा परिस्थितीत आपण शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोना सदृश्य कोणतेही लक्षणे कोणत्याही व्यक्तीला जाणवली तर अश्या व्यक्तीने तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. या बाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याने जीटीपीएस कॉलनी येथे जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता पंकज नागदेवता यांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात आली.

सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र माढवी सर, जीटीपीएसचे अधिकारी सुनील वाघ, दिनेश सोनवणे आणि वाहनचालक विशाल हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.