बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनीलला’ 10 लाखांचा दंड
सिटी बेल लाइव्ह / चेन्नई #
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे औषध बाजारात आणले.
मात्र या औषधावरून मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले आहे. तसेच न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली ही लोकांच्या मनातील भीतीची फायदा घेत हे औषध बाजारात आणले आहे. त्यामुळे लोकांना हे औषध कोरोनावरील औषध असल्याचे वाटतेय.
खरं तर हे औषध फक्त ताप, सर्दी, खोकला यावरचे आहे. असे न्यायालयाने सांगत पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
चेन्नईतील अद्यार इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पतंजली विरोधात याचिका दाखल केली आहे.
Be First to Comment