Press "Enter" to skip to content

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई आयोजित “कर्तृत्ववान महिला सन्मान” कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुंबई(पी. डी. पाटील ): भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था,मुंबई तर्फे कर्तृत्ववान महिलांसाठी ‘राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात संपन्न.

दादर (प) येथील गुरुकुल सभागृहामध्ये जागतिक महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून, ध्येयवादी महिलांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने कृषी, आरोग्य, साहित्य, शिक्षण, कला आणि अध्यात्म यांसारख्या विविध क्षेत्रांत स्व कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महाराष्ट्रातील रणरागिणींचा शोध घेऊन त्यांना या सोहळ्यात ‘राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून ‘ सन्मानित करण्यात आले.

   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षणातज्ज्ञ व साहित्यिक डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ.वसुंधरा शिवणेकर, ज्येष्ठ वैदिक वास्तु तसेच डाऊझिंग प्रशिक्षक, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ.आनंदसर , ज्येष्ठ कृषी अभ्यासक श्री प्रकाश वसंत पेडणेकर, ओरा अभ्यासक डॉ. चंद्रमोहन विष्णू रानडे हे या प्रसंगी उपस्थित होते.

‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, ही मुंबईत गेली चोवीस वर्षे प्राचीन वैदिक विज्ञान विविध शास्त्रे विद्या कला वास्तुशास्त्र डाऊझिंग, वैकल्पिक वैद्यकीय संशोधन इत्यादी क्षेत्रात कार्य करते.
स्त्री शक्तीचा सन्मान आणि त्यांच्या कार्याला वैचारिक वैदिक सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून देत असताना वेदकालीन विदुषी स्त्रियांचे दिव्य स्मरण व्हावे, हा या पुरस्कारांच्या मुळाशी विचार असल्याने अदिती धरित्री संवर्धन, लोपामुद्रा, अन्नपूर्णा रससिद्धी, मैत्रेयी प्रज्ञा सन्मान, ब्रह्मवादिनी गार्गी, वाक अंभरुनी, अध्यात्म गौरव अशा समर्पक नावांच्या पुरस्काराची योजना आहे. “वर्तमान काळात हाडांची काडं आणि रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खस्ता खाते ती आई असते ” असे शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवणेकर श्रोत्यांना संबोधीत करताना म्हणाले.” स्त्री संघर्षातून मार्ग काढून यशस्वी होऊ शकते हे सिद्ध केल्याचे सांगून वसुंधरा शिवणेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

सन 2026 वर्षातील पुरस्कार प्राप्त सन्माननीय महिलांमध्ये सौ. अनुसया वसंत कदम, सातारा: ‘कृषी गोसेवा ” अदिती धरित्री संवर्धन पुरस्कार”; सौ. मंदा लहू पवार,पुणे: ‘लोपामुद्रा आरोग्य साधना राष्ट्रीय पुरस्कार’; डॉ. सौ. उज्वला म्हात्रे, नवी मुंबई: ‘लोपामुद्रा आरोग्य साधना राष्ट्रीय पुरस्कार’; डॉ. पूनम द. पतंगे, पनवेल: ‘लोपामुद्रा आरोग्य राष्ट्रीय पुरस्कार’; सौ. शोभना कानस्कर, नवी मुंबई: “अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय पुरस्कार”; सौ. रंजना राजेंद्र शिंदे, मुंबई: साहित्यासाठी “मैत्रेयी प्रज्ञा राष्ट्रीय पुरस्कार”; सौ. कन्या सचिन आढाव, पुणे: शिक्षण व कला क्षेत्र “ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय पुरस्कार”; सौ.नीता निशिकांत पाटील, सांगली: “ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय पुरस्कार”; सौ.चारू वाखारकर,पुणे; “ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय पुरस्कार; सौ सविता अमर,मुंबई; योगशास्त्र : “वाक अंभरुनी अध्यात्म गौरव राष्ट्रीय पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

या सर्व सन्माननीय महिलांना संस्थेचे सुवर्णपदक, सन्मान चिन्ह, मानपत्र आणि संस्थेतर्फे निर्मित वनस्पतीजन्य आरोग्य उत्पादन भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौ.सुनंदा माने, पुणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.