Press "Enter" to skip to content

श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर) विद्यालय खांब येथे संगणक कक्षाचे उद्घाटन


खांब : नंदकुमार मरवडे

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर) विद्यालय खांब येथे संगणक कक्षाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून‌ गेली अनेक वर्षे समाजातील गरजू व्यक्ति व विद्यार्थी वर्गासाठी मदतीचा हात देऊन आधार देणारी संस्था म्हणून राज्यस्तरावर नामांकित मेलजोल संस्था मुंबई यांच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या सदरील उच्च दर्जाचे संगणक कक्षाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.यावेळी चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष प्रकाश थिटे, संचालक रामचंद्र चितळकर,राम मरवडे, गजानन भोईर,सुभाष माटल, सरपंच सुरेखा पार्टे, मोहिते,मेलजोल संस्थेचे मुख्य अधिकारी पंकजा, कृष्णा झुगरे,श्रीमती संदे मॅडम, कैलास गवळी,महेश बांगारे,विभा भातिकरे, वामन मोहिते, गजानन खामकर,मुख्याध्यापक सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने व काळाची गरज ओळखून मेलजोल संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकच संगणक साक्षर होतील.

महेंद्र पोटफोडे,
चेअरमन नशिप्र.मंडळ खांब
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.