Press "Enter" to skip to content

शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख पदी रामदास शेवाळे

शिवसेना सचिव संजय मोरे व किरण पावसकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

सिटी बेल ∆ मुंबई ∆

शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेब भवन मुंबई येथे रामदास शेवाळे यांची शिवसेना पक्षाच्या पनवेल जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

रामदास शेवाळे यांनी सदर नियुक्ती पत्र शिवसेना सचिव संजय मोरे व किरण पावसकर यांच्या हस्ते आज स्वीकारले. शेवाळे हे याआधी पक्षाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते.

यावेळी त्यांच्या सोबत लातूर जिल्हा संपर्क प्रमुख ॲड. श्रीनिवास क्षीरसागर,अमित घारपुरे , कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, विजय जाधव , संजय शेडगे,आनंदा माने , नवनाथ वणवे, विराट पवार , सुधीर ठोंबरे, सुभाष घाडगे, मदन वगरे, महेश गोडसे,राहुल मोरे, सिद्धेश म्हात्रे, प्रेम गोडसे, ओमकार बळीप इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.