खिडूकपाडा ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक, प्रशासनाने कितीही दबाव टाकला तरी सिडकोचे गेट बंद करणारचं : प्रभूदास भोईर यांचा खणखणीत इशारा
सिटी बेल ∆ खिडूकपाडा – कळंबोली ∆ एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट….
खिडूकपाडा येथील ग्रामस्थांचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत.सुविधांची वानवा सतावते आहे.रस्ते,पाणी,स्वच्छता,आरोग्य,शिक्षण आशा मूलभूत गरजांपासून आजही इथला ग्रामस्थ कोसो दूर आहे. रस्त्याच्या कामांच्या निविदा निघून आठ महिने लोटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावनामध्ये शैक्षणिक साहित्याची वानवा आहे. अभ्यासिका मोडकळीस आलेल्या असून भवनाच्या डागडूजी ची गरज निर्माण झाली आहे. माथाडी कामगारांसाठी भूखंड राखीव ठेवलेला असून देखील त्याच्यावरती प्रत्यक्ष माथाडी भवनाच्या बांधकामाला सुरुवात नाही.
यापूर्वी केवळ आश्वासनांची लोणकडी थाप मारत येथील ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्यास प्रशासनाने भाग पाडले होते. परंतु आता मात्र फसवले गेल्याची भावना येथील ग्रामस्थांच्या दिसून येत आहे.म्हणूनच भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून सिडकोचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आंदोलन येत्या दहा तारखेला आयोजित केले आहे. या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी सांगितले की राज्य माथाडी कामगार संघटनांची पूर्ण ताकद देखील या आंदोलनात घेऊन रस्त्यावर उतरणार….
सिटी बेल अलर्ट :-
सिटीबेल न्यूज पोर्टल वरील लिखाण, व्हिडिओ,फोटो पुनर्वापरापूर्वी समूह संपादकांची संमती आवश्यक…. अनुमती विना पूर्ण अथवा अंशतः मजकूर, फोटो व्हिडिओ पुनरप्रकाशित केल्यास कंटेंट प्रायव्हसी अँड सिक्युरिटी ॲक्टअनुसार कारवाई करण्यात येईल.
Be First to Comment