Press "Enter" to skip to content

युवानेते कुणाल महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रूग्णवाहीकेचे लोकार्पण, गरजवंताला स्टाॅल,रोटरी घनदाट जंगल प्रकल्पास एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप

सिटी बेल ∆ उलवे नोड ∆

आपल्या वडिलांकडून सामाजिक बांधिलकीचे धडे गिरवत कोरोना काळात हजारो गरजूंना शिजवलेले अन्न व जीवनावश्यक अन्नधान्याची मदत करणारे युवा नेते कुणाल महेंद्रशेठ घरत यांचा ४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

राजू लक्ष्मण आदमळे हे मुळचे साताऱ्याचे सध्या कळंबोली येथे राहत आहेत. ते घरोघरी अगरबत्ती विकण्याचे काम करत होते. मधेच त्यांना अर्धांग वायूचा झटका आला ते हतबल झाले होते, त्यांनी आपली कैफियत महेंद्रशेठ घरत यांना सांगितली असता त्यांना जागेवर बसून धंदा करण्यासाठी राजू आदमळे यांना स्टॉल बांधून दिला त्याच्या चाव्या त्यांना वाढदिवसाच्या दिवशी हस्तांतर केल्या.

कोरोना काळात यमुना सामजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ४ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत होत्या रुग्णवाहिकेचे महत्व समजून उलवे नोडसाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती याचे गांभीर्य लक्षात घेऊन महेंद्रशेठ घरत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिका लोकार्पण केली.

तसेच रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या विद्यमाने रोटरी घनदाट जंगल प्रकल्पास ५० झाडे संवर्धनासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिनांक ६ नोव्हेंबर रोजी देणार आहेत.

उलवे नोड कॉंग्रेस पक्ष कार्यालय येथे छोटेखानी पार पडलेल्या कार्यक्रमात स्टॉल हस्तांतरण व रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख जेष्ठ नेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक प्रकाश चौधरी, उद्योजक सुरेश पाटील, माजी उपसभापती वसंत काठावले, पनवेल तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष नंदराज मुंगाजी, उरण तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद म्हात्रे, पेण तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक मोकल, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखील डवळे, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. निर्मला म्हात्रे, पनवेल तालुका महिला अध्यक्षा सौ. योगिता नाईक तसेच शेकडोंच्या संख्येने नातेवाईक व मित्रमंडळींनी उपस्थित राहून कुणाल घरत यांस शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.