आता जबाबदारी वाढली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखविला आहे तो सार्थ करून दाखवेन : विक्रांत बाळासाहेब पाटील
सिटी बेल ∆ पनवेल ∆
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी दैदीप्यमान कामगिरी करणारे विक्रांत बाळासाहेब पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे.ओघवती वक्तृत्व शैली, तळागाळातील कार्यकर्त्यांनसोबत असलेला कनेक्ट, ज्येष्ठ नेत्यांनी सोपविलेली जबाबदारी परिपूर्ण पणे पार पाडणे, आणि पक्षाच्या विचारधारेवर असलेली अगम्य निष्ठा या शिदोरीच्या जोरावर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा राजकीय प्रवास आचंबित करायला लावतो.
नियुक्तीपत्र प्राप्त झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विक्रांत पाटील म्हणाले की ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी मला दिली आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन. माझ्यासाठी पद हे कधीही महत्त्वाचे नसते तर त्या पदावर विराजमान झाल्यानंतर येणारी जबाबदारी पार पाडणे हेच मी कायम माझ्या डोळ्यापुढे ध्येय ठेवत आलो आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच मला चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे मोठी उंची असलेले नेतृत्व त्यांच्या टीम मध्ये मला काम करायची संधी देते ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. मी या दोन्ही दिग्गज नेत्यांचे आभार मानतो तसेच राज्य कार्यकारिणीचे पूर्व अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यकाळात मी भाजयुमो प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी मला नेहमीच ताकद दिली, ऊर्जा प्रदान केली महाराष्ट्रभर फिरण्यासाठी संधी प्राप्त करून दिली. त्यामुळेच आज या पदावर काम करायची मला संधी मिळत आहे म्हणून मी त्यांचे देखील आभार मानतो. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रविण दरेकर,पंकजा ताई मुंढे यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी मला सर्वोत्कृष्ट काम करून दाखविण्यासाठी संधी प्राप्त करून दिली.
आमदार प्रशांत दादा ठाकूर, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते परेश ठाकूर यांचे अमूल्य असे सहकार्य सातत्याने लाभत असते. ते पुढे म्हणाले की,फक्त देशाचेच नव्हे तर जगाचे शीर्ष नेतृत्व करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी एक सक्षम राजकीय पक्ष म्हणून जनमानसात स्थान मिळवत आहे. आता जबाबदारी वाढलेली आहे. माझे पिताश्री बाळासाहेब पाटील यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन सातत्याने माझ्या पाठी असतात नेते मंडळींनी माझ्यावर दाखविलेला विश्वास, ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळणारे मार्गदर्शन या सगळ्यांच्या जोरावरती सुदृढ राष्ट्रनिर्मिती,संघटन सक्षमीकरण यासाठी मी कटीबद्ध असेन.
भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव म्हणून विक्रांत पाटील यांनी यापूर्वी तीन वर्षे जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून देखील त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली आहे.
ज्या प्रभागाने मला राजकीय ओळख प्राप्त करून दिली त्या प्रभागातील नागरिक त्यांच्या हृदयामध्ये मला स्थान देतात. किंबहुना माझ्या प्रभागातील नागरिक म्हणजे माझे कुटुंब आहे असे मला वाटते, अशा भावना विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रकट केल्या.
Be First to Comment